Wed, Nov 14, 2018 12:14



होमपेज › Nashik › नाशिकच्या रुग्णावर रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया

नाशिकच्या रुग्णावर रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया

Published On: Sep 11 2018 1:54AM | Last Updated: Sep 10 2018 10:58PM



नाशिक : प्रतिनिधी

शहरातील 59 वर्षीय व्यावसायिक अशोक मेहता यांच्यावर सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात रोबोटिक बायपास शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कार्डियॉक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांच्यासह पथकाने ही शस्त्रक्रिया केली. 

मेहता यांच्यावर रोबोटिक्सच्या सहाय्याने किमान इन्वेसिव्ह कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (सीएबीजी) शस्त्रक्रिया झाली. मेहता यांना जूनमध्ये हृदयविकाराचा धक्का बसला होता. नाशिकच्या रुग्णालयात त्यांची कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. 

डॉ. भामरे यांनी सांगितले की, ही शस्त्रक्रिया पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत कमी इन्वेसिव्ह असते. रुग्णांवर याचा अधिक चांगला परिणाम होतो, शस्त्रक्रियेचा आघातात्मक प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होतो आणि रुग्ण लवकर तंदुरुस्त होतो. भामे यांच्यावर शस्त्रक्रिया करताना तीन बायपासेस करण्यासाठी सुमारे आठ तासांचा अवधी लागला. डाव्या बाजूला एक छोटा एक सेमीचा छेद (इन्सिजन)देण्यात आला आणि पुढे हृदयाला नव्याने रक्तपुरवठा व्हावा म्हणून जोडणी करण्यासाठी पाच ते सहा सेमीचा छेद देण्यात आला, असे डॉ. भामरे यांनी सांगितले.