Wed, Mar 27, 2019 03:55होमपेज › Nashik › वाचा : ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळच्या जिद्देची रहस्य

वाचा : ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळच्या जिद्देची रहस्य

Published On: Jan 07 2018 12:36PM | Last Updated: Jan 07 2018 12:37PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

हरियाणाच्या एका खेळाडूने 'महाराष्ट्राची मुले नौकानयनात काहीच करू शकत नाही' असे उद्गार काढल्याने माझ्यात खुन्नस निर्माण झाली आणि महाराष्ट्राचा भगवा देशाबाहेर फडकवण्याचा निर्धार केला, अशा शब्दांत रिओ ऑलिम्पिकमधील नौकानयनपटू दत्तू भोकनळ याने आपल्या यशाचे रहस्य सांगितले. 

मराठा विद्या प्रसारक (मविप्र) मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणा म्हणून नाशिकमध्ये आलेल्या भोकनळने पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी तो बोलत होता. रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेल्या चुका सुधारणार असून,  त्या दृष्टीने सध्या पुण्यात जोरदार तयारी सुरू आहे. पुढील ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता फेरी मार्च 2020 मध्ये होणार असून, त्या पार्श्वभूमीवर येत्या सप्टेंबरमध्ये इंडोनेशिया येथे होणारी एशियन गेम्स स्पर्धा महत्त्वाची आहे, असेही दत्तू म्हणाला.