Sat, Aug 24, 2019 21:15होमपेज › Nashik › रस्त्यात भात लागवड आंदोलन

रस्त्यात भात लागवड आंदोलन

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 29 2018 10:21PMघोटी : प्रतिनिधी

बलायदुरी गावात पारदेवीकडे जाणार्‍या रस्त्याची  चिखलमय अवस्था आहे. येथून जाणार्‍या वाहनांमुळे रस्ते अधिक खराब झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम दुर्लक्ष करीत आहे. ग्रामस्थांनी रस्त्यात भात लागवड करून आंदोलन केले.बलायदुरी येथे गुडघाभर चिखल असणार्‍या रस्त्यात सरपंच कैलास भगत यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी भात लागवड केली.

तालुक्यातील बलायदुरी गावामध्ये गावातील रस्ते खराब झाले आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही अधिकारी दाद देत नाहीत. हॉटेलकडे जाण्यासाठी वाहनांना दुसरा मार्ग नाही. त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. यामुळे रस्त्यांवर गुडघाभर चिखल तयार झाला आहे. यावेळी योगिनाथ भगत, प्रकाश भगत, सुंदराबाई भगत, भाऊ भटाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.