होमपेज › Nashik › रेकॉर्ड वरील फरार गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक

रेकॉर्ड वरील फरार गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक

Published On: May 02 2018 11:22AM | Last Updated: May 02 2018 11:22AMनाशिकरोड : वार्ताहर

गावठी कट्ट्याच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारात सह आरोपी तसेच रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगाराला नाशिकरोड पोलिसांनी साफळा रचून अटक केली. विजय भीमराव पगारे (वय, २५ , गोरेवाडी , नाशिकरोड ) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गावठी कट्टा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना रंगेहात पकडले होते. तेव्हापासून पगारे पसार होता.

दिनांक १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रात्री अकरा वाजेच्या सुमाराला नाशिकरोड पोलिसांनी साफळा रचून येथील गोरेवाडी रेल्वे गेट जवळून पगारेला ताब्‍यात घेतले.  त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडसुत हस्तगत केले. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम दळवी , पोलिस नाईक प्रकाश भालेराव , समाधान वाजे, अविनाश जुन्द्रे, विशाल कुंवर आदींनी कार्यवाही केली. पोलिस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलिस आयुक्त मोहन ठाकुर यांनी पोलिस पथकाचे अभिनंदन केले. 

दरम्यान मागील काही दिवसात गावठी कट्ट्या प्रकरणात पोलिसांनी साफळा रचून अटक केलेली ही तिसरी कारवाई ठरली आहे. या घटनेनंतर नाशिकरोड परीसरात गावठी कट्टा खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय जोरात सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Tags : nashik district, Revolver, alive cartridge, crime, nashik rood, nashik police