Mon, Apr 22, 2019 05:55होमपेज › Nashik › महसूल गैरव्यवहारावर खासगी एजन्सीचा वॉच

महसूल गैरव्यवहारावर खासगी एजन्सीचा वॉच

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:18AMनाशिक : प्रतिनिधी 

महसूल विभागात मागील काही वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे या विभागातच समोर येत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वाधिक कारवाई या विभागात केली आहे. यापुढे गैरव्यवहार खपवून घेणार नाही. खासगी एजन्सी नेमून गैरव्यवहाराची माहिती पोलिासांना दिली जाईल, असा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

नियोजन भवनमध्ये बुधवारी (दि.11) पाटील यांनी महसूल विभागाची बैठक घेऊन विविध विभागांचा आढावा घेतला.त्यावेळी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कामात हलगर्जीपणा व गैरव्यवहार आढळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील 200 हून अधिक कर्मचारी घरी पाठवले आहे. महसूल विभागातील कामकाजात सुधारणा केली नाही तर तुमची गय केली जाणार नाही, असा सज्जड दमच त्यांनी भरला. या बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदींसह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.