Mon, Mar 25, 2019 09:07होमपेज › Nashik › राष्ट्रवादी आमदारांचे विभागीय आयुक्तांना निवेदन

राष्ट्रवादी आमदारांचे विभागीय आयुक्तांना निवेदन

Published On: Mar 10 2018 4:45PM | Last Updated: Mar 10 2018 4:45PMनाशिक : प्रतिनिधी

आजपर्यंत अनेक वेळा नुकसान होऊन शेतकर्‍यांना भरपाई मिळालेली नाही. बोंड आळीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विद्यार्थ्यांबद्दल शासन गंभीर नाही. स्पर्धा परीक्षेच्या जागांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात तीव्र असंतोष आहे. अशा अनेक विषयांसंदर्भात निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री सुनील तटकरे, आमदार जयंत जाधव, हेमंत टकले, नाशिकचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, नाजी आमदार दिलीप बंनकर, अर्जुन टिळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुनील तटकरे यांनी आमच्या काळात सुरु झालेली कामे भाजपा सरकारने बंद पाडली आहेत. सरकारविषयी जनतेच्या मनात असंतोष आहे. कांद्याला हमी भाव मिळत नाही, नैसर्गिक आपत्तीने द्राक्ष बागा जाळून जात आहे. कापूस, तूर, सोयाबीन केंद्रे सर्वत्र सुरु करावीत, राज्य सरकारकडून प्रसिद्धीवर होत असणारा खर्च थांबवावा, राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट कर्ज माफी देऊन सातबारा कोरा करण्यात यावा यासह भाजपा सरकारने शेतकरीविरोधी भूमिका घेतली असून राज्यात चाललेला भ्रष्टाचार थांबवावा या मागण्यांसह अनेक गंभीर मागण्यांचे निवेदनात समावेश करण्यात आला आहे.