होमपेज › Nashik › लोकन्यायालयात चार कोटी ३५ लाख ५८ हजारांची वसुली 

लोकन्यायालयात चार कोटी ३५ लाख ५८ हजारांची वसुली 

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 22 2018 10:55PMउगाव : वार्ताहर

निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी (दि.22) झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात वादपूर्व व न्यायप्रविष्ट अशा एकूण 24 हजार 391 प्रकरणांपैकी 4289 प्रकरणे निकाली निघाली असून, तडजोडीतून सुमारे चार कोटी 35 लाख 58 हजार 892  रुपयांची वसुली झाली आहे. 

निफाडचे जिल्हा सत्र न्या. एस. सी. मगरे, ए. जी. मोहबे, पी. डी. दिग्रसकर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्या. आर. आर. हस्तेकर, आर. एम. सातव, एस. बी. काळे,  प्रम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. कोचर, एस. के. दुगावकर यांचे अध्यक्षतेखाली एकूण आठ समित्यांद्वारे लोकन्यायालयाचे कामकाज झाले. त्यात 81  ग्रामपंचायतींच्या 22 हजार 294 प्रकरणांपैकी 3 हजार 999 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. त्यातून 88 लाख 47 हजार 170 रुपयांची करवसुली झाली.

त्याचबरोबर लोकनेते दत्ताजी पाटील बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, लासलगाव मर्चंट बँक, देना बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, महावितरण आदींच्या 1 हजार 445 प्रकरणांपैकी 168 प्रकरणे निकाली निघाली.  त्यात 2 कोटी 90 लाख 18 हजार रुपये वसुली झाली. न्यायप्रविष्ट 652 प्रकरणांपैकी 122 निकाली निघाली. त्यात 56 लाख 93 हजार 722 रुपये वसुली झाली. वादपूर्व व न्यायप्रविष्ट अशा 4 हजार 289 प्रकरणांतून एकूण चार कोटी 35 लाख 58 हजार 892 रुपयांची वसुली झाली.

लोकन्यायालय समितीवर सदस्य म्हणून अ‍ॅड. संजय दरेकर, विजया जगताप, विलास तासकर, रामनाथ शिंदे, सविता बडवर, प्रभाकर केदार, शरद वाघ, नीलम निकम, श्रीकांत रायते, जयश्री पटाईत, अफरोज शेख, श्‍वेता घोडके, अरविंद बडवर, राहुल गायकवाड, लक्ष्मण वाघ, भावना चोरडिया यांनी कामकाज पाहिले. तर न्यायालयाचे अधीक्षक किरण क्षीरसागर, सहाय्यक अधीक्षक अशोक मोरे, विधी सेवा समितीचे लिपिक सुनील पवार, अनंत काशीकर आदींनी प्रशासकीय धुरा सांभाळली.

Tags : nashik, nashik news,  4 crore 35 lakh 58 thousand, Recovery, lok adalat,