Tue, Nov 20, 2018 22:08होमपेज › Nashik › पालेकर, कोल्हे दाम्पत्याला ‘गोदावरी गौरव’

पालेकर, कोल्हे दाम्पत्याला ‘गोदावरी गौरव’

Published On: Jan 20 2018 1:33PM | Last Updated: Jan 20 2018 1:43PMनाशिक : प्रतिनिधी

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणाऱ्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. यामध्ये डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे (लोकसेवा), अमोल पालेकर (नाट्य व चित्रपट), डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान- विज्ञान), पं. सत्यशील देशपांडे (नृत्य व संगीत), सुदर्शन शिंदे व महेश साबळे (साहस), सुभाष अवचट (चित्रकला) हे पुरस्काराचे मानकरी ठरले.

कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या स्मृतिदिनी येत्या १० मार्चला नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा पुरस्कार दर दोन वर्षांनी देण्यात येतो.