Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Nashik › पीओएस मशीनवर उमटेना ठसे

पीओएस मशीनवर उमटेना ठसे

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 22 2018 10:49PMद्वारका : वार्ताहर

शासनाच्या आदेशान्वये स्वस्त धान्य दुकानातून पीओएस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. मात्र, या मशीनवर बहुतांशी कार्ड धारकांची नावेच नाहीत, तर ज्यांची नावे आहेत त्यांचा अंगठा अनेकदा ठेवूनही मशीन ऑपरेट होत नाही. त्यातच मशीनला अनेकदा नेटवर्कच मिळत नसल्याने गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.

शासनाने रेशन दुकानांवरील गैरकारभारला आळा घालण्याबरोबरच लाभार्थ्यांना पारदर्शीपणे स्वस्त धान्यांचा लाभ मिळावा यासाठी पीओएस मशीनच्या आधारे धान्य वाटप सुरू केले आहे. विशेष म्हणजे नागरिकांना या पद्धतीने धान्य घेताना काही अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी सब ऑफीसरची नेमणूकही केली आहे. मात्र, हे ऑफिसर कुठेच फिरकत नसल्याने नागरिकाचे हाल होत आहेत. शासनाने हे मशीन त्वरित बंद करून गरीब व गरजू लाभार्थ्यांना पूवीर्र्प्रमाणेच धान्य वाटप करावे मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

Tags : nashik, nashik news, Ration, shopkeepers, uncomfortable,