Tue, Apr 23, 2019 13:58होमपेज › Nashik › कळवण : रस्त्याची दुरावस्था; कालव्याच्या दुरुस्तीसाठी रास्ता उद्या रास्ता रोको 

कळवण : रस्त्याची दुरावस्था; कालव्याच्या दुरुस्तीसाठी रास्ता उद्या रास्ता रोको 

Published On: May 15 2018 1:32PM | Last Updated: May 15 2018 1:32PMकळवण :  प्रतिनिधी

पुनंद खोऱ्यातील रवळजी देसराणे ते जयदर या  महत्वाच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याच खोऱ्याच्या शेतीला लाभदायक ठरणाऱ्या सुळे उजव्या कालव्याला १२ वर्षांनंतरही पाणी न आल्याने याची दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.यासाठी उद्या (बुधवार दि. १६ मे)  सकाळी ११ वाजता कळवण शहरातील बस स्थानक परिसरात रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय पुनंद खोऱ्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे.  

 कळवण तालुक्यातील पुनंद खोरे म्हणनू ओळखल्या जाणाऱ्या व तालुक्यातील महत्वाच्या गावांचा समावेश असलेल्या रवळजी, देसराणे, देसराणे पाडा, ईंशी, नाळीद, धार्डे दिगर, पाडगण, भांडणे, पिंपळे, सुळे ते जयदर या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना जीव गमवावा  लागला आहे. तसेच या परिसरातील दुचाकीस्वारांना पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांनप्रमाणे नागरिकांचे शरीरही खिळखिळे झाले आहे. शेतमालाच्या दळणवळणसाठी मोठ्या अडचणी येत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. पुनंद खोऱ्याच्या प्रगतीत महत्वपूर्ण ठरणाऱ्या सुळे उजव्या कालव्याच्या कामात  १२ वर्षांपूर्वी  भ्रष्ट्राचार झाला आहे. या कालव्याला अद्यापही पाणी आलेले नाही. या कालव्याच्या कामाला लाखो रुपये किमतीच्या जमिनी या भागातील शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात दिल्या आहेत. धरणात पाणी असताना बारावर्षात एकदाही या कालव्याला पाणी आलेले नाही. जमिनी देऊनही या भागातील शेतकरी उन्हाळी पिकांच्या शेवटच्या पाण्यासाठी मुकला आहे. रस्त्याच्या दुरुस्ती  व कालव्याच्या कामाची चौकशी होऊन तात्काळ दुरुस्ती करून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.यासाठी कळवण शहरातील बस स्थानक परिसरात रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय पुनंद खोऱ्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे.  

दैनिक पुढरीच्या वृत्तमालिकेची दाखल घेऊन सर्व गावे एकत्र येऊन उद्या रस्ता रोको करण्यात येणार आहे. यामुळे दैनिक पुढारी सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.