Wed, May 22, 2019 10:45होमपेज › Nashik › परप्रांतीय युवकाचा वृद्धेेवर बलात्कार

परप्रांतीय युवकाचा वृद्धेेवर बलात्कार

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 07 2018 11:56PMनिफाड : वार्ताहर

झोपलेल्या 60 वर्षीय महिलेस मारहाण करत बलात्कार केल्याची संतापजनक घटना निफाड येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. निफाड पोलिसांनी 24 तासांच्या आत मूळचा बिहार राज्यातील असलेल्या राजेशराय दिनालाल यादव (25) या संशयित परप्रांतीय युवकास ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोळवाडी चौफुलीवर पीडित वृद्ध महिला दिवसभर बसलेली असते. गुरुवारी रात्री 11.45 ते 12.15 वाजेदरम्यान ही महिला चौफुलीवरील एका दुकानाच्या वसरीत झोपलेली असताना 25 वर्षीय युवकाने या वृद्ध महिलेच्या डोक्यावर व हातावर लाकडी दांड्याने मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, सहायक निरीक्षक जयवंत सातव यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पीडित महिलेला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात धाडले.

तर अवघ्या 24 तासांच्या आत मूळचा बेगुसराय, बिहार येथील रहिवासी असलेल्या व सध्या येथील राजीव गांधीनगर येथे राहणारा राजेशराय दिनालाल यादव (25) या संशयित युवकास या प्रकरणी अटक करण्यात आली.