Fri, Apr 26, 2019 15:20होमपेज › Nashik › विक्रमवीर रंजय त्रिवेदी यांचे हद्यविकाराने निधन

विक्रमवीर रंजय त्रिवेदी यांचे हद्यविकाराने निधन

Published On: Dec 10 2017 1:13PM | Last Updated: Dec 10 2017 1:13PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

गतवर्षी नाशिकमध्ये सलग तीन दिवस चालण्याचा विक्रम करणारे आणि भविष्यात गीनिज बुकमध्ये विक्रमाची नोंद करण्यासाठी धडपडणारे रंजय त्रिवेदी ( वय, ४९) यांचे शनिवारी हद्यविकाराने निधन झाले. त्रिवेदी यांना शनिवारी सकाळी छातीत त्रास होऊ लागल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. 

अभियंता असलेले त्रिवेदी हे सतत चालणे, जलतरण व धावणे या वैशिष्ट्यामुळे नाशिककरांमध्ये परिचित होते. गेल्या तीन वर्षापासून त्रिवेदी हे नववर्षाच्या स्वागताला येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सलग चालायचे. पहिल्यावर्षी १२ तास, त्यानंतरच्या वर्षी संपूर्ण दिवस ते चालले. गतवर्षी 31 डिसेंबर रोजी सलग 3 दिवस हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ते चालत होते. त्यावेळी त्यांनी चालत राह, आरोग्य जपा असा संदेशही नाशिककरांना दिला होता.

येत्या 31 डिसेंबरला मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे होणार्‍या चालण्याच्या कार्यक्रमात सहभागी होत नाशिकचे नाव झळकविण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, तत्पुर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्रिवेदी यांच्या निधनाचे वृत्त येताच सिडकोतील त्यांच्या घरी चाहत्यांनी गर्दी केली.