Sun, Nov 18, 2018 02:53होमपेज › Nashik › नाशिकला मिरवणुकीसाठी राम-गरुडरथ सज्ज!

नाशिकला मिरवणुकीसाठी राम-गरुडरथ सज्ज!

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 12:13AMनाशिक : प्रतिनिधी

रामनवमीनंतर दोन दिवसांनंतर कामदा एकादशीच्या दिवशी शहरातून राम व गरुड रथाची मिरवणूक काढली जाते. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या रथ मिरवणुका पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविक गर्दी करतात. अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या या रथोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही रथांची नुकतीच रंगरंगोटी करण्यात आली आहे.

येत्या मंगळवारी (दि.27) निघणार्‍या या रथ मिरवणुकीसाठी दोन्हीही रथ सज्ज आहेत. तर दुसरीकडे महापालिकेने रथ मिरवणूक मार्गाच्या सुव्यवस्थेकडे लक्ष दिले आहे. गोदाघाटावरील संत गाडगे महाराज पुलाखालून जाणार्‍या राम रथ मिरवणुकीचा मार्ग महापालिका कर्मचारी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोकळा करत आहेत.

Tags : Nashik, Nashik news, Kamada Ekadashi, Ram, Eagle chariot procession,