Thu, Apr 25, 2019 03:28होमपेज › Nashik › मनमाडच्या नगराध्यक्षपदी राजेंद्र आहिरे

मनमाडच्या नगराध्यक्षपदी राजेंद्र आहिरे

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:02PMमनमाड : वार्ताहर

मनमाड नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे आरपीआयचे राजेंद्र आहिरे यांनी मंगळवारी (दि.24) हाती घेतली. पालिकेत शिवसेना आरपीआयची युती असून, आहिरे यांना प्रभारी नगराध्यक्षाची जबाबदारी देण्याचा शब्द शिवसेनेतर्फे देण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी त्यांच्या हाती सूत्रे देवून सेनेने शब्द पाळल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, गटनेते गणेश धात्रक यांनी सांगितले.

आहिरे यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पालिकेजवळ फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. सुमारे दोन वर्षापूर्वी झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-आरपीआयची युती होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या पद्मावती धात्रक थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आल्या. तर पालिकेत सेनेला पूर्ण बहुमतही मिळाले. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आरपीआयचे राजेंद्र आहिरे हे बिनविरोध निवडून आले होते. आहिरे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, गटनेते गणेश धात्रक, शहरप्रमुख मयूर बोरसे, राजेंद्र भाबड, छोटू पाटील, नगरसेवक गंगाभाऊ त्रिभूवन, कैलाश गवळी, लियाकत शेख, जाफर मिर्झा आदी उपस्थित होते.