होमपेज › Nashik › नाशिक : मनमाड परिसरात पावसाची हजेरी

नाशिक : मनमाड परिसरात पावसाची हजेरी

Published On: Feb 12 2019 10:21PM | Last Updated: Feb 12 2019 10:21PM
मनमाड : प्रतिनिधी

मनमाड शहर परिसरात आज, मंगळवारी रात्री बेमोसमी पावसाने हजेरी लावली. तुरळक सरीनी सुरूवात झालेल्या या पावसाने सुमारे २० मिनिटे झोडपून काढले. अचानक झालेल्या या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. 

बेमोसमी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पावसाने अचानकपणे लावलेल्या या हजेरीमुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळी संकटात सापडलेल्या बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जगावे तरी कसे असा गंभीर प्रश्न पडला आहे. अवकाळी पावसाचा फटका हा कांद्या सोबत द्राक्षांना देखील बसणार असल्यामुळे बागायतदार शेतकरी देखील चिंतेत पडला आहे