Mon, Apr 22, 2019 15:42होमपेज › Nashik › क्रॉसिंग पुलातही खाल्ली मलई!

क्रॉसिंग पुलातही खाल्ली मलई!

Published On: May 11 2018 1:42AM | Last Updated: May 10 2018 10:57PMकळवण : बापू देवरे

शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात येण्या-जाण्याकरिता कालवा ओलांडून जाण्यासाठी क्रॉसिंग पूल (व्हीआरबी) करण्यात आले असून, त्यातही अधिकारी-ठेकेदाराने मलई खाल्ल्याचे समोर आले आहे. मातीमिश्रित वाळू व दगडाचा सर्रास वापर करण्यात आल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

चुकीच्या पद्धतीने क्रॉसिंग पूल (व्हीआरबी) करण्यात आले आहे. अंदाजपत्रकानुसार काम न झाल्याने कामाचा दर्जा घसरला आहे. निविदा प्रक्रिया राबविताना वाढीव दराने कामे केली आहेत. शासन नियमानुसार रस्ता क्रॉसिंग पूल 500 मीटरच्या वर आत घेता येत नाही. परंतु, शासनाचे नियम धाब्यावर बसवून पूल करण्यात आले आहे. जवळजवळ  क्रॉसिंग पूल करण्यात आल्यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

ज्या शेतकर्‍यांना क्रॉसिंग पुलाची गरज आहे त्या शेतकर्‍यांना पूलच दिले नसल्याने शेतकर्‍यांवर अन्यायच केला आहे. परिणामी, शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठी कसरत करावी
लागते.

18 जुलै 2014 रोजी कालव्याच्या 12055 मीटरपासून 17300 मीटरपर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले. त्या निविदा प्रक्रियेत 4.99 टक्क्यांहून जास्त काम देण्यात आले. त्या कामामध्ये तीन  फूट पूल करण्यात आले असून, वर्क ऑर्डरप्रमाणे कामे केलेली नाही. हे काम झाले तेव्हा शाखा अधिकारी म्हणून शेख या अधिकार्‍याची नेमणूक होती. त्यामुळे त्यांच्या कामावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते.