Sat, Mar 23, 2019 16:05होमपेज › Nashik › कळवण : पुनंद कालव्याच्या कार्यालयाला आग; चर्चेला उधाण

कळवण : पुनंद कालव्याच्या कार्यालयाला आग; चर्चेला उधाण

Published On: Aug 19 2018 10:51AM | Last Updated: Aug 19 2018 10:51AMकळवण : प्रतिनिधी 

कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथील पुनंद उजवा कालवा व सुळे उजवा कालव्याच्या कार्यालयाला शॉटसर्किटमुळे महत्वाच्या शासकीय कागदपत्रे जाळून खाक झाली आहेत. शॉटसर्किटमुळे आग लागली का लावली असा संशय नागरिकांनी उपस्थित केला आहे. जलसंपदा विभागाचे पुनंद उजवा कालवा व डावा कालवा कोल्हापूर फाटा, मानूर तालुका कळवण येथील कार्यलयास आज पहाटे आग लागून कार्यालयातील दप्तर, संगणक व इतर साहित्य जाळून खाक झाले आहे. आग विझविण्यासाठी सटाणा नगर परिषदेच्या अग्नी शामकदलाला पाचारण करण्यात येऊन आग विझविण्यात आली आहे. परंतु या आगीत दोन वेगवेगळ्या कार्यालयातील फक्त दप्तर असलेल्याच खोलीत आग कशी लागली याचे गौडबंगाल काय याबाबत प्रत्यक्षदर्शी व कळवण तालुक्यात उलट सुलट चर्चा  सुरु आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी कळवण तालुक्यात कोल्हापूर फाटा येथे पुनद डावा कालवा व सुळे उजवा कालव्याला आज, रविवार सकाळी ६ वाजेच्या सुमारे शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन्ही कार्यालयातील महत्वाचे कागदपत्रे व वस्तू जळून खाक झाली आहे,अचानक लागलेल्या आगीत सुळे उजवा कार्यालयात वाघाड धरणाचे सन १९८० मधील रोजगार हमी योजनेचे महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली असून सुळे डावा कालव्यातील महत्वाचे कागदपत्रे जळाली आहेत कॉम्पुटर व खुर्च्या जळून खाक झाले आहेत.

दोन महिन्यापूर्वी दैनिक पुढारी  ने या विभागातील सुळे उजवा कालव्यातील गैरव्यवहार उघड केले होता याबाबत वृत्तमालिका लावून मंत्रालय स्तरावरून चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती समिती मार्फत चौकशी ही सुरु झाली होती ती टाकळण्यासाठी पुरावे नष्ट करण्यासाठी कागदपत्रे जाळण्यात आले असल्याची चर्चा सुरु आहे. कळवण तालुक्यातील महाकाय अशा पुनंद (अर्जुनसागर )धरणांतर्गत येणारया सुळे उजवा व सुळे डावा कालव्याच्या महत्वाच्या शासकीय दप्तर जळून खाक झाले त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी शंका उपस्थित झाली आहे,पुनंद धरण्याच्या व सुळे उजवा व सुळे डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात भष्टचार झाला आहे,निकृष्ट दर्जाचे कामे करून ठेकेदार व अधिकऱ्यानी मोठ्या प्रमाणात माया गोळा केली असल्याची चर्चा कळवण तालुक्यात कायम होत असते,या प्रकल्पाच्या पुरावे नष्ट करण्यासाठी दप्तर नष्ट केले नसेल संशय आदिवासी नागरिकांनी उपस्थित केला आहे,

दोन्ही कार्यालयांना शॉट सर्किटमुळे  आग लागली हे विशेष आहे,दोन्ही कार्यालयातील जळालेले रूम मध्ये अंतर फार आहे दोन्ही कार्यालयामध्ये शौचालयचे आहे असून दोन्ही कार्यालयाच्या दप्तराच्या रूमला आग लागली आहे दोन्ही कार्यालयाच्या अंतर मध्ये एक रूम आहे शौचालय आहे ते कार्यालय जळले नाही हे विशेष आहे,शौचालयाच्या वायरिंग जळल्या नसल्याचे दिसून आले आहे.  कळवणमध्ये पाटबंधारे  विभागाच्या  पुनंद डावा व उजवा कालवा उपविभागिय कार्यालयाला आग लागून महत्वाचे  शासकीय कागदपत्रे जळून खाक झाल्याची घटना घडली असून शॉर्ट सर्किटमुळे  आग लागल्याचा दावा केला जात असला तरी कालवा  कामात झालेला गैरव्यवहार दडपण्यासाठी  आग लावण्यात आल्याचा आरोप  केला जात आहे .

कळवण तालुक्यात पुनंद धरण काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून या धरणांतर्गत सॅन २००५ ते २००६ दरम्यान सुळे उजवा व सुळे डावा कालव्याचे काम करण्यात आले आहे. यात सुळे उजव्या कालव्याचे सिद्धेश्वर ते पाटविहीर हा २१ किमी चा कालवा २१ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे. कालवा तयार होऊन ९ ते १० वर्ष झाले आहेत अद्यापर्यंत पाटविहीर पर्यंत कालव्याला पाणी आलेले नाही येथील शेतकरी गेल्या दशकभरापासून धरणातील पाण्यापासून वंचित राहिला आहे, अशीच परिस्थिती डाव्या कालव्याची आहे. पूर्ण शक्तीने या कालव्यात पाणी वाहत नसल्याने उन्हाळ्यात धरणात पाणी असतांना शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सुळे उजव्या कालव्यात १ किमी ते १४ किमी पर्यंत धिम्यागतीने पाणी येते तर १४ किमी पासून २१ किमी म्हणजे पटविहीर पर्यंत पाणीच येत नाही. या कालव्याची योग्य  खोलीन घेतल्याने पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचत नाही. यामुळे येथील शेतकऱ्यांना विहीर, इंधनविहीर करण्यास परवानगी मिळत नसल्याने उन्हाळी पिकापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र होते मात्र मध्यंतरी पाठबंधारे विभागाच्या अधिकारी व ठेकेदारांनी कालव्याचे काम केले त्यावेळी पाण्याचा प्रवाह थोडा वाढला आहे,

वंचित शेतकऱ्यांनी १५ मे २०१८ रोजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली  मुंबई येथे जाऊन जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री गिरीश महाजन यांना कालव्याच्या चौकशी करण्याचे निवेदन दिले होते. त्याचवेळी श्री महाजन यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार  श्री महाजन यांचे प्रतिनिधी स्वीय सचिव संदिप जाधव यांनी संपूर्ण कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी का पोहचू शकत नाही याची करणे जाणून घेतली. या पाहणीत तत्कालीन अधिकारी , ठेकेदार यांनी हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. या कालव्याच्या सत्य अहवाल मंत्रीमहोदयांना सादर करण्याचे आश्वासन श्री जाधव यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना दिला आहे.   त्यावरून काही दिवसांपासून या कालव्याच्या निकृष्ट कामाची चौकशी सुरु आहे. शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्धार केला होता शेतकऱ्यांना पूर पाणी देऊ असे आश्वासन दिले होते सुळे उजव्या कालव्याला पूर पाणी सोडण्यात आले आहे,

आज पहाटे पुनंद उजव्या व डाव्या कालव्याच्या दोन वेगवेगळ्या कार्यालयातील महत्वाचे दस्तऐवज दप्तर असलेल्या दोन खोल्याना आग लागून संपूर्ण दप्तर लाकडी रॅक, संगणक, प्रिंटर, टेबल, खुर्च्या व  इतर साहित्य जळून खाक झाले आहे. याबाबत कळवण पोलिसात दिलीप यशवंत बच्छाव शाखा अभियंता पुनंद उजवा कालवा  यांनी फिर्याद दिली आहे की, सकाळी जगताप नामक जलसंपदा विभागाचे चालक यांनी त्यांना भ्रमणध्वनी वरून कार्यालयालयाला आग लागल्याची माहिती दिली. हि आग पहाटे पाच वाजेपूर्वी शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी लावला आहे.  

पुनंद खोऱ्यातील शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित होते. त्यांनी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री यांची भेट घेऊन कालव्याच्या कामाची चौकशी केली होती. व चौकशी सुरु झाली होती. चौकशी सुरु झाल्या नंतर काही ठेकेदारींनी मे  महिन्यात कामही करण्याचा प्रयत्न केला परंतु काम झाले नाही. या कामांची चौकशी होऊन दोषी असलेल्या तत्कालीन अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. मोहन जाधव - सेक्रेटरी किसनसभा

आज कार्यालयाला लागलेल्या आगीचे स्वरूप पाहता ४० ते ५० फूट अंतर असलेल्या दोन वेगवेगळ्या इमारतीतील फक्त कागदपत्र असलेल्या खोल्यानाच आग लागल्याने ही आग प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत आहे. या विभागाची चौकशी सुरु असल्याने आग लागली की  लावली याची चौकशी झाली पाहिजे. -प्रदिप पगार - अध्यक्ष क्रांतिवीर छावा संघटना  

जलसंपदा विभागाच्या कार्यालयास आग लागून दप्तर जळून खाक झाले असले तरीपण कालव्याच्या कामात झालेला भ्रष्ट्राचार सर्वज्ञात आहे. पुनंद धरणातून कालव्याला आजही पाणी सोडले तरी पाटविहीर पर्यंत पाणी येणार नाही हे सत्य नाकारता येणार नाही. याची चौकशी झाली पाहिजे. अकलीचे तारे तोडणाऱ्यानी आग लावायचीच होती तर कालव्याला लावली पाहिजे होती.   - अंबादास जाधव - शिवसेना तालुकाप्रमुख 

एकंदरीत संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कळवण पाटबंधारे विभागाच्या  पुनंद डावा - उजवा कालवा  उपविभागिय कार्यालयाल आग  प्रकरणात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालून  आग का लागली त्याची चौकशी करावी  पुनंद डावा व उजव्या  कालव्याचा गैरव्यवहार करणारे चेहरे उजेडा आणून आगीमुळे संशयात सापडलेल्या  पुनंद डाव्या व उजव्या कालवा उपविभाग कार्यालय आग  प्रकरणाचे सत्य  जनतेसमोर  आणण्याची गरज आहे. -टिनू पगार अध्यक्ष, छत्रपती युवा सेने जिल्हा

कळवण तालुक्यातील  कोल्हापूर फाटा येथे पुनंद डावा व उजव्या कालवा उपविभागिय कार्यालयाला  पहाटेच्या सुमारास  शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सटाणा आग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत  आगीत महत्वाचे कागदपत्रे  जळून खाक झाली आहेत. आग लागल्याच्या घटनेची  कळवण पोलिसात  तक्रार दाखल  करण्यात आली असून आगीचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात  आल्याचे पाटबंधारे  विभागाकडून  सांगण्यात येत आहे . -एन.डी.बाविस्कर, उपअभियंता पाटबंधारे  विभाग

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्रालय स्तरावरून चौकशी समिती स्थापन केली होती. समितीमार्फत चौकशीही सुरू झाली होती. चौकशी समिती येण्यापूर्वीच  पुनंद डावा व उजवा कालवा  उपविभागीय  कार्यालयाला  आग लागून कागदपत्रे  जाळून खाक झाल्याने  आग संशयाच्या  भोवऱ्यात सापडली असून .चौकशी  टाळण्यासाठी व गैरव्यवहार  दडपण्यासाठीच सर्व कागदपत्रे जाळण्यात आल्याचा आरोप  होत असून , पुनंद  डावा - उजव्या कालवा उपविभाग कार्यालय  आगीची वरिष्ठ पातळीवरून  चौकशी करून  दोषी  अधिकारी - कर्मचाऱ्यांवर  कारवाई करण्याची मागणी होत आहे 

माहितीच्या  अधिकारातही अनेक अर्ज -  या कार्यलयात माहितीच्या अधिकारात अनेक अर्ज आल्याचे समजते . तसेच या कार्यालयात कडवा प्रकल्पाचेही कागदपत्र ठेवण्यात आली होती. माहिती वेळेत न दिल्याने अपीली अधिकारी , विभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणी चालू असल्याने खरी माहिती लपविण्यासाठी कार्यालयाला आग लावल्याची चर्च्या  आहे. या आगीमुळे मंत्रालय जळाल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत