Thu, Apr 25, 2019 18:45होमपेज › Nashik › ऐन सुट्ट्यांमध्ये खासगी बसेसची भाडेवाढ

ऐन सुट्ट्यांमध्ये खासगी बसेसची भाडेवाढ

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 09 2018 11:32PMनाशिक : प्रतिनिधी

राज्यात व परराज्यातील दूरच्या प्रवासासाठी प्रवाशांची पसंती असणार्‍या खासगी बसेसचे भाडे येत्या आठवडाभरात वाढणार आहे. ऐन सुट्ट्यांचा मोसम व डिझेलची झालेली दरवाढ यामुळे भाडे वाढल्याने प्रवाशांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. 

नाशिकमधून राज्यातील अनेक जिल्ह्यांत तसेच परराज्यांत जाण्यासाठी दररोज खासगी बसेसच्या फेर्‍या सुरू असतात. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती तसेच परराज्यातील अहमदाबाद, बडोदा, सुरत, हैदराबाद, इंदूर, जोधपूर, बंगळुरू आदी शहरांत जाण्यासाठी शहरातून बसेस उपलब्ध असतात. या बसेसचे भाडे आठवडाभरात वाढणार असल्याचे संबंधित व्यावसायिकांनी सांगितले. 

खासगी बसेसना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे एरवीही सुट्ट्यांत दुपटीने भाडे वाढविले जाते. मात्र, यंदा त्यात डिझेल दरवाढीचीही भर पडली आहे. रेल्वेचे आरक्षण वेळेवर मिळत नाही, तर राज्य परिवहन मंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसेस अद्याप बर्‍याच मार्गांवर सुरू झालेल्या नाहीत. परिणामी, प्रवाशांकडे खासगी बसेसशिवाय अन्य वाहनांचा पर्याय उरत नाही. सध्या या बसेसचे भाडे हे नेहमीइतकेच असले, तरी खासगी बस व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, येत्या आठवडाभरात भाडेवाढ होण्याची चिन्हे आहेत. 

Tags : Nashik, Nashik news, Private bus, Rental, increase,