Fri, Feb 22, 2019 12:10होमपेज › Nashik › नाशिक : कारागृहातच कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक : कारागृहातच कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Feb 22 2018 7:24PM | Last Updated: Feb 22 2018 7:24PMनाशिकरोड : वार्ताहर

येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणार्‍या एका कैद्याने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शौचालयात पॅन्टच्या नाडीने गळफास लावून घेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. सोमनाथ दगडू शेडे असे या कैद्यांचे नाव आहे. कारागृह पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून कारवाईचा बडगा उगारत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, सोमनाथ दगडू शेडे हा नाशिक मधवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. काल (बुधवारी) रात्री ८ च्या सुमारास कारागृहातील मंडल क्रमांक ७, यार्ड १ मधील बॅरेक क्रमांक ४ जवळ असलेल्या शौचालयात शेडे याने स्वत:च्या पॅन्टच्या नाडीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना कारागृहातील इतर कैदी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यानी शेडे यास ताब्यात घेतले. तर त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले. 

मात्र, शेडे याने गळफास घेण्याचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकले नाही. कारागृह कर्मचारी भागवत निकम यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे अधिक तपास करत आहेत.