स्थानिक गुन्हे शाखा आणि कळवण पोलिसांची दमदार कामगिरी 

Published On: Sep 12 2019 8:43PM | Last Updated: Sep 12 2019 11:51PM
Responsive image


कळवण : प्रतिनिधी  

नाशिकच्या कळवण तालुक्यातील नांदुरी येथील चिखलीपाडा येथे  कळवण पोलिस ठाण्याच्या पथकाने ४ दरोडेखोरांना पकडून ताब्यात घेतले आहे. त्याच्यांकडून सुमारे ३ लाख ३५ हजार २०२ रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि कळवण पोलिसांच्या दमदार कामगिरीची एकच चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका टोळी संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता. रात्री पकडण्यात आलेल्या या टोळीकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, धारदार चॉपर, १ लोखंडी टॉमी, लोखंडी कटवणी, स्कु ड्रायव्हर, लोखंडी पान्हा, मोबाईल, रोख रक्कम १४ हजार ७०७ रु असा एकूण ३ लाख ३५ हजार २०२ रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चोरी गेलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

मात्र अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून गेला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. यासराईत गुन्हेगारांकडून मिळालेल्या साहित्यावरून त्याचा दरोडा घालण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट होत आहे. असे कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले. कळवण पोलीस ठाण्यातील  सराईत गुन्हेगार श्रावण पिंपळे हा गेल्या ५ महिन्यापासून फरार होता. निफाड न्यायालयात केसची सुनावणी झाले नंतर मध्यवर्ती कारागृहात परत घेऊन जात असताना पोलिसांचे हाताला फटका देऊन कोर्टाबाहेरून पळून गेला होता. यापूर्वी सन २०१६ मध्ये अहमदनगर जिल्हातील तोफखाना पोलिस ठाणे लॉकअप मधून पळून गेला होता. या गुन्हेगारावरील जबरी लूटमार व घरफोडी व मोटर वाहन चोरी असे गुन्हे तपास उघडीस झाले आहेत. या आरोपीने ३ घरफोडी २ जबरी चोरी १ मोटर सायकल चोरी असे मोठे गुन्हे दाखल आहेत,  पुढील तपास अजून काही गुन्हे उघडीस येण्यास शक्यता आहे.  

पुढील तापास नाशिक ग्रामीण अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के के पाटील कळवण पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ. रवींद्र शिलावट, दीपक अहिरे, पुंडलिक राऊत, दत्तात्रय साबळे, अमोल घुगे, प्रवीण सानप, राजू सांगळे आदी करत आहे .