Sat, Jul 20, 2019 09:28होमपेज › Nashik › शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान

शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 23 2018 11:41PMउपनगर : वार्ताहर

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या  निवडणूक प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि.23) सायंकाळी थंडावल्या. या मतदारसंघासाठी पाच जिल्ह्यांतील 54 तालुक्यांत सोमवारी (दि.25) मतदान होणार असून, निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 

मतदानाचा प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वच उमेदवारांनी आपली शक्‍ती पणाला लावलेली आहे. दुसर्‍या प्राधान्यक्रमाची मते ही निर्णायक ठरणार असून, मातब्बर उमेदवार इतर उमेदवारांना दुसर्‍या क्रमांकाची मते आपल्या पारड्यात टाकण्यासाठी विनंती करीत आहेत.    

एकूण 16 उमेदवार रिंगणात असून, पाचही जिल्ह्यांत 94 मतदान केंद्रे उपलब्ध आहेत. मतदानाची वेळ यावेळी पहिल्यांदाच वाढवली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. पाचही जिल्ह्यांतील एकूण 53,335 इतके मतदार असून, त्यात 40412 पुरुष आणि 12923 स्रिया मतदार आहेत. प्राधान्यक्रम देऊन मतदान होणार असून, यासाठी नाशिक शहरात 25 मतदान केंद्रे उपलब्ध असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. मागील वेळी 53,484 मतदारांपैकी 44,438 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. किती शिक्षक मतदान करून लोकशाहीला बळकटी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दि. 28 जून रोजी अंबड येथे मतमोजणी होईल.