Wed, Dec 19, 2018 21:31होमपेज › Nashik › पोलीस तपासणार रक्तमिश्रित पाण्याचे नमुने

पोलीस तपासणार रक्तमिश्रित पाण्याचे नमुने

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 12 2018 11:16PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

जुने नाशिकमधील प्रभाग 14 मध्ये राजवाडा परिसरातील घरांमध्ये नळांमार्फत रक्तमिश्रित झालेल्या पाणीपुरवठा झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, भद्रकालीतील काही कत्तलखाने चालकांची भद्रकाली पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याचप्रमाणे येत्या सोमवारी (दि.15) पाण्याचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. 

गुरुवारी (दि.11) राजवाडा परिसरातील नळांमधून रक्तमिश्रीत पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त  केला आहे. घटनेची माहिती मिळताच आ. देवयानी फरांदे यांच्यासह विभाग सभापती शाहिन मिर्झा, नगरसेविका शोभा साबळे, समीना मेमन यांनी परिसरात जाऊन पाहणी केली. तसेच, संशयितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी महानगरपालिका अधिकार्‍यांना परिसरातील पाइपलाइनचे नूतनीकरण करण्यासाठी आमदार निधी देण्यात येईल, असे आश्‍वासन फरांदे यांनी दिले. भद्रकाली पोलिसांनी गुन्हे दाखल असलेल्या कत्तलखाने चालकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे रक्तमिश्रीत पाण्याचे नमुने सोमवारी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.