Wed, Jul 17, 2019 18:00होमपेज › Nashik › राजकीय वरदहस्त असलेल्या दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

राजकीय वरदहस्त असलेल्या दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Published On: Apr 27 2018 12:58AM | Last Updated: Apr 26 2018 10:55PMमालेगाव : प्रतिनिधी

मेहुणे गावात राजकीय वरदहस्त असलेल्या गावठी दारूच्या अवैध गुत्त्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. येथील अवैध दारूविक्री आणि राजकीय हितसंबंध चर्चेत होते. याची दखल घेत  पोलिसांनी कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी सुरू आहे.  

तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मेहुणे गावात हातभट्टीची गावठी दारू तयार करण्याचा अवैध धंदा तेजीत आल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आलेल्या होत्या. त्याकडे यंत्रणेचे हेतूपुरस्रपणे दुर्लक्ष होत असल्याच्या संशय ग्रामस्थांनी अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे केलेल्या होत्या. पोद्दार यांनी विशेष पथक स्थापन केले होते. या पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण यांनी दुचाकीवरून इंदिरानगर भागात प्रवेश करून पाहणी केली होती. अवैध दारूच्या उद्योगात महिलांच्या सहभागाची माहिती मिळाल्याने कारवाईदरम्यान पोलिसांनी दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचार्‍यांनाही सोबत घेतले होते. कारवाईत प्रल्हाद मोतीराम वाघ, राजेंद्र बारकू कुंवर व प्रल्हाद ओमकार सोनवणे (तिघे रा. इंदिरानगर भिलाटी) हे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारूविक्री करताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

Tags : Nashik, nashik news, Malegaon, liquor bar, Police raid,