Thu, Nov 22, 2018 16:09होमपेज › Nashik › पोलीस अधीक्षक लोहार निलंबित

पोलीस अधीक्षक लोहार निलंबित

Published On: Feb 16 2018 1:51AM | Last Updated: Feb 15 2018 11:03PMनाशिक : प्रतिनिधी

वादग्रस्त कारकीर्द आणि नागरिकांच्या तक्रारींमुळे नाशिक शहरात नागरी हक्क संरक्षण दलाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीदेखील लोहार यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  

लोहार यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. जळगाव येथे सेवेत असतानाही आरोपींना मारहाण, खंडणी वसुलीच्या प्रकरणात लोहार यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांची बदली नाशिक येथे करण्यात आला. नागरी हक्क संरक्षण दलाच्या पोलीस अधीक्षकपदी असताना त्यांना नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याचे काम असतानाही लोहार यांनी गैरकारभार केल्याचा आरोप होत आहे.

लोहार यांनी तक्रारी सोडवण्यासाठी आलेल्या नागरिकांकडूनच आर्थिक फायदा केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रारी आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्यात आली. डॉ. पाटील यांनीही लोहार यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.