Wed, Jan 23, 2019 02:24होमपेज › Nashik › नाशिक : म्हसरुळ पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

नाशिक : म्हसरुळ पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

Published On: Dec 13 2017 7:56AM | Last Updated: Dec 13 2017 7:56AM

बुकमार्क करा

पंचवटी : प्रतिनिधी

म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. मखमलाबाद रोड ते आसाराम बापू पुला दरम्यान असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर टाकलेल्या छाप्यात उच्चभ्रू तरुण आणि तरुणीसह हॉटेल मालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. ताब्यात घषतलेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. 

दरम्यान, छाप्यात दोन बाल कामगार देखील सापडल्याने बालकामगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.