Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Nashik › नाशिक : पोलिस निरीक्षकाची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

नाशिक : पोलिस निरीक्षकाची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

Published On: Feb 01 2018 2:34AM | Last Updated: Feb 01 2018 2:34AMधुळे : प्रतिनिधी

धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रामेशसिंग परदेशी यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटे १च्या सुमारास घडली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,’रामेशसिंग परदेशी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात काम करुन शहर पोलीस ठाण्यात गेले. तेथून ते घरी परतले. त्यांनतर रात्री उशिरा बाहेर फिरण्यासाठी गेले. तासाभरात परत आल्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून त्याची पत्नी खोलीत धावत गेली. या वेळी ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांची किंकाळी आणि गोळीचा आवाज ऐकून शेजारी राहणारे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे धावत परदेशी यांच्या बंगल्यात धावत आले. त्यांनी हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सांगितला. 

या घटनेनंतर सर्व अधिकारी व कर्मचारी त्याच्या बंगल्यावर आले. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. परदेशी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.