Sat, Mar 23, 2019 18:09होमपेज › Nashik › जे. डी. सी. बिटको शाळेतील १५ विद्यार्थ्यांना विषबाधा

जे. डी. सी. बिटको शाळेतील १५ विद्यार्थ्यांना विषबाधा

Published On: Jan 19 2018 8:58PM | Last Updated: Jan 19 2018 8:58PMनाशिकरोड : वार्ताहर

जे. डी. सी. बिटको शाळेतील १५ विद्यार्थ्यांना ज्युस पिल्याने विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्‍या  विद्यार्थ्यांवर बिर्ला रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. या घटनेनंतर पालकांचा आक्रोश पाहून मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळेला टाळे ठोकून काढता पाय घेतला. याप्रकरणी अद्याप संबंधित कंपनीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

मागिल काही दिवसांपासून शाळेत एका खाजगी ज्युस कंपनीच्या मार्केटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आम्ही कंपनीच्या जाहिरातीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ज्युस वाटप करीत आहे. आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील ज्युस वाटप केला आहे. तूम्हीही विद्यार्थ्यांना ज्युस वाटपास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. यावेळी शाळा प्रशासनाने प्रथम नकार दर्शविला होता. त्‍यानंतर संबंधित कंपनीचे कर्मचारी शुक्रवारी पुन्हा शाळेत आले आणि त्‍यांनी ज्युस वाटप करण्याचा आग्रह धरला. व्यवस्थापणाने  परवानगी दिल्‍यानंतर दुपार सत्रातील इयत्ता पाचवी आणि सहावी मधील विदयार्थ्यांना ज्युस वाटप केला. ज्युस पिल्यानंतर साधारणपणे पाच वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना उलट्या होण्यास सुरवात झाली. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने शाळेचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी शाळेच्या समोर असणाऱ्या बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी विद्यार्थ्यांना दाखल केले. यादरम्यान शाळा सुटण्याची वेळ होऊन गेली होती. मुले शाळेतून घरी परत आले नसल्याने पालकांनी शाळेत धाव घेतली. 

शाळेत आलेल्या पालकांना घटनेची माहिती मिळाली. संतापलेल्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला मात्र, शाळेतील शिक्षकांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न करीत शाळेतून पळ काढला. यावेळी उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन घटनास्‍थळी हजर झाले. त्यांनी पालकाची समजूत काढत प्रकरण मिटवले. 

दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने अद्याप समबडीत ज्युस कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पालक वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.