Sun, Feb 23, 2020 03:18होमपेज › Nashik › प्लास्टिक बंदी करताना मनपा कर्मचार्‍यांना धक्काबुक्की 

प्लास्टिक बंदी करताना मनपा कर्मचार्‍यांना धक्काबुक्की 

Published On: Aug 23 2019 3:19PM | Last Updated: Aug 23 2019 3:19PM

दुध बाजार येथे कारवाई करताना मनपा कर्मचारी द्वारका (नाशिक) : वार्ताहर 

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करत असताना भद्रकालीतील दुध बाजार येथील दुध विक्रेत्यांनी मनपा अधिकारी आणि कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात काल, गुरूवारी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

प्लास्टिकचा वापर करणार्‍यांवर मनपाच्या स्वच्छता विभागाकडून कारवाई केली जात आहे. पुर्व विभागात स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ, डी. बोडके यांचे पथक काल, गुरुवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास दुध बाजार येथे कारवाईसाठी गेले होते. यावेळी या पथकाने तेथील दोन दुध विक्रेत्यांवर प्लास्टिक वापरल्याबद्दल प्रत्येकी ५-५ हजार रुपयांचा दंड केला.

या कारवाई दरम्यान तेथील स्थानिक विक्रेते यावेळी तेथे जमा होत त्यांनी दंड कमी करण्यास सांगत अधिकार्‍यांसोबत अरेरावी केली. यावेळी अधिकार्‍यांनी विक्रेत्यांचे शुटींग काढण्याचा प्रयत्न केला असता विक्रेत्यांनी अधिकार्‍यांचे मोबाइल हिसकावून घेत धक्काबुक्की केली. याबाबत अधिकार्‍यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात विक्रेत्यांविरोधात तक्रार दाखल केली.