होमपेज › Nashik › जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : गणेशोत्सव, नवरात्रीसाठी परवानगी

पंधरा दिवस रात्री १२ पर्यंत वाजवा रे..!

Published On: Jan 02 2018 1:12AM | Last Updated: Jan 01 2018 11:56PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकार्‍यांनी 15 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक, बँड, बॅन्जो वाजविण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये गणेशोत्सव व नवरात्रसाठी प्रत्येकी चार दिवसांचा समावेश असल्याने जिल्हावासीयांसाठी अनोखी भेट ठरणार आहे. 

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार रात्री 10 वाजेनंतर सभागृहे, सामूहिक सभागृहे, श्रोतुगृहे वगळता इतर ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे सणउत्सवांच्या काळात नागरिकांना मनमुराद आनंद घेता येत नव्हता. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. सर्वसामान्यांची नाराजी बघता स्थानिक स्तरावरच जिल्हाधिकार्‍यांनी वर्षातील पंधरा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्याचे अधिकार बहाल केले. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी 1 जानेवारीलाच आदेश काढले आहे.

या दिवशी 12 पर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी 

शिवजयंती (19 फेब्रुवारी) 
डॉ बाबासाहेब आंबडेकर जयंती (14 एप्रिल)
महाराष्ट्र दिन (1 मे).
गणेशोत्सव उत्सव (17 व 21, 22,23 सप्टेंबर)
नवरात्रोत्सव : (15 ते 18 ऑक्टोबर) 
दिवाळी : (07 नोव्हेंबर) 
ईद -ए-मिलाद : (20 नोव्हेंबर)
ख्रिसमस (25 डिसेंबर)
नववर्ष स्वागत (31 डिसेंबर)