Sat, Apr 20, 2019 23:52होमपेज › Nashik › मोरांची शिकार करणारी टोळी सिन्‍नरला जेरबंद

मोरांची शिकार करणारी टोळी सिन्‍नरला जेरबंद

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 11:59PM

बुकमार्क करा
वावी : वार्ताहर

मोरांची शिकार करणारी टोळी जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचार्‍यांना शनिवारी (दि.6) पहाटे  यश आले. सिन्नर न्यायालयाने पाचही संशयित आरोपींना तीन दिवसांची फॉरेस्ट कस्टडी दिली आहे. 

तालुक्यातील चापडगाव-चास शिवारातील वनविभागाच्या राखीव क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास परिसरातील ग्रामस्थांना डोंगर तसेच जंगलातून बॅटर्‍यांचा प्रकाश चमकत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळली. त्यांनी तत्काळ भोजापूरच्या स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने परिसर घेरला. ग्रामस्थ आल्याची कुणकुण लागताच मोरांची शिकार करणार्‍या टोळीना पलायन करण्यास सुरूवात केली. ग्रामस्थांनी पाठलाग करून धुळवड येथील सुभाष दगडू गांगड (28), शरद गांगड(19), दिनकर गांगड (47), भारत दिनकर गांगड (21) तर चास येथील कमळूूची वाडी येथील संतोष उघाडे (25) यांना पकडले. त्यांच्याकडे मोर पकडण्याची जाळी आढळून आली.