होमपेज › Nashik › नाशिकच्या मुलींची सीए परीक्षेत बाजी

नाशिकच्या मुलींची सीए परीक्षेत बाजी

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:06AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

सनदी लेखापाल परीक्षेत नाशिक शहरासह जिल्ह्यातील 150 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मागील वर्षी झालेल्या सीपीटी, तसेच पहिला आणि दुसरा ग्रुप आणि दोन्ही ग्रुप मिळून झालेल्या अंतिम परीक्षेत हे विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. 

सनदी लेखापाल परीक्षेची काठिण्य पातळी पाहता दरवर्षी या परीक्षेत एकूण प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 15 ते 20 टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात. यावर्षीदेखील देशभरात 22.76 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात देखील नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या अंतिम परीक्षेत पहिल्या ग्रुपमध्ये 94, दुसर्‍या ग्रुपमध्ये 32 आणि दोन्ही गु्रप मिळून 22 विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील श्रृतिका किरण अग्रवाल (224), गायत्री रवींद्र कदम (218) यांच्यासह वज्रेश मेहता, संतोषी छाजेड, समीक्षा कर्नावट, सुयश बडजादे, शुभम कुलकर्णी, प्रतीक भुतडा हे विद्यार्थी उत्‍तीर्ण झाल्याचे समजते. त्याचप्रमाणे डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या सीएच्या सीपीटी परीक्षेत 141 विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत.