Sun, Jul 21, 2019 07:46होमपेज › Nashik › ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ संस्कृती पृथ्वीच्या मुळावर

‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ संस्कृती पृथ्वीच्या मुळावर

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 2:06AM

बुकमार्क करा

पंचवटी : वार्ताहर 

‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ संस्कृती विरोधात मानव उत्थान मंच संघटनेच्यावतीने रामुकंड येथे आयोजित कार्यक्रमात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह उपस्थितांना प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली. यावेळी मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी प्लास्टिक विरोधात सर्वांनी एकत्र येण्याचे अवाहन केले. प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी जनजागृती व्हावी म्हणून रामकुंड परिसरात सोमवार (दि.11) सकाळी 10 वाजता प्लॅस्टिकपासून भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. मागील वर्षी याच ठिकाणी मानव उत्थान मंचतर्फे प्लास्टिकचा मॅन तयार करण्यात आला होता. तर यावर्षी प्लास्टिकच्या विळख्यात अडकलेली पृथ्वी प्लास्टिकपासून तयार करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने, पुढील कित्येक वर्ष ते नष्ट होऊ शकणार नाही. त्यामुळष प्लास्टिकचा भस्मासुर अधिकच घातक होत चालला आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी प्लास्टिक विरोधी लढ्यात सहभागी व्हावे असे यासाठी मानव उत्थान मंचतर्फे जनजागृती केली जात आहे. प्रदर्शनाला मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, पंचवटी प्रभाग सभापती प्रियंका माने, धनंजय माने आदींनी भेट देत प्रदर्शनाची पाहणी केली.

दरम्यान, ही पृथ्वी साकारण्याचे काम यश भामरे, आकाश पटेल, अशफाक ताहिरी, हेमल लडाणी, प्रियांका बंगर, श्रुती वाघ, धनश्री कुलकर्णी, सुजय हन्नमवार, ओजस, चिन्मय चिटणीस यांनी केले. तर त्यांना मार्गदर्शन जगबिरसिंह, भारती जाधव, निशिकांत पगारे, योगेश बर्वे,नितीन शुक्ल, सुनंदा जाधव आदींनी केले. पृथ्वीला कचराकुंडी बनण्यापासून वाचवणे आमचा मुख्य हेतू आहे . वसुदैव कुटुंबकम् । पृथ्वी आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे अस पुराणांंमध्ये म्हटले आहे. आणि आपल्या कुटुंबातल्या एखादया व्यक्तीची ही अवस व्हावी तर नाहीना मग ते रोखण्याचे काम आम्ही करीत असल्याचे भारती जाधव यांनी सांगितले.