Fri, Apr 26, 2019 03:31होमपेज › Nashik › नाशिक : तीन गुन्हेगारांना बेड्या 

नाशिक : तीन गुन्हेगारांना बेड्या 

Published On: Dec 30 2017 12:46AM | Last Updated: Dec 29 2017 11:50PM

बुकमार्क करा
पंचवटी : वार्ताहर

शहरातून तडीपार, प्राणघातक हल्ल्यातील फरारी व खंडणी प्रकरणातील 3 सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पंचवटी पोलिसांना यश आले. पहिल्या घटनेत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी तडीपार केलेला किरण शेळकेला रामकुंड परिसरातून अटक करण्यात आली. दुसर्‍या घटनेत सायखेडा येथून आरोपीस अटक केली. वाघाडी येथील ज्वाल्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अविनाश कौलकरवर हल्ला करणारा विनायक उर्फ झगड्या दीपक लाटे या फरारी आरोपीसही पोलिसांनी सायखेडा येथून अटक केली.

तिसर्‍या प्रकरणात रिक्षाचालकांकडून खंडणी मागणारा इरफान शेख मोहम्मद उर्फ बाबू (24 रा. नेल्सन नगर, द्वारका) याला देखील पोलिसांनी अटक केली. तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश इंगोले, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, भूषण रायते, जितेश जाधव यांनी ही कारवाई केली.