Sun, May 19, 2019 13:57
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › पंचवटी एक्स्प्रेस आजपासून नव्या लूकमध्ये

पंचवटी एक्स्प्रेस आजपासून नव्या लूकमध्ये

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 11:07PMउपनगर/मनमाड : वार्ताहर

गेल्या 43 वर्षांपासून प्रवाशांना अविरत सेवा देणारी नाशिककरांची प्रवासी वाहिनी पंचवटी एक्स्प्रेस आता बुधवारपासून नव्या लूकमध्ये दिसणार आहे. ‘पंचवटी’च्या नवीन कोचचे काम पूर्ण झाले असून, हा कोच बुधवारी (दि.9) मनमाड ते मुंबईदरम्यान धावणार आहे. नाशिकरोड स्थानकावर सकाळी साडेसहा वाजता मान्यवरांच्या हस्ते या कोचचे लोकार्पण होेणार आहे. 

पंचवटी एक्स्प्रेसचे काम बर्‍याच दिवसांपासून सुरू होते. अखेर हे काम पूर्ण झाले असून, 21 डब्यांची ही नव्या लूकमधली रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. एकाच दिवसात मुंबईला फेरफटका मारून येण्यासाठी आणि मनमाड ते मुंबई प्रवास करणार्‍यांसाठी ही रेल्वे वरदान ठरली आहे. म्हणून आता नव्या तंत्रज्ञानाने नटलेल्या या रेल्वेत प्रवाशांना निरनिराळ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकात या रेल्वेचे स्वागत केले जाणार आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसे, भुसावळचे डीआरएम आर. के. यादव, सिनियर डीसीएम सुनील मिश्रा, नाशिकरोड स्थानकप्रमुख आर. के. कुठार, रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे, नितीन चिडे, बिपीन गांधी उपस्थित राहणार आहेत. रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी, गुरुमितसिंग रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी आदींनी नवीन रेल्वेसाठी पाठपुरावा केला होता. त्यांनी येवल्यात जाऊन नवीन ‘पंचवटी एक्स्प्रेस’ची पाहणी केली.

अशी आहे नवी पंचवटी एक्स्प्रेस : पंचवटीच्या नवीन बोगींची बांधणी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत झाली आहे. काही दिवसांपूर्वी ही रेल्वे येवला येथे येऊन पोहोचली. ही रेल्वे 21 डब्यांची असून, यात विमान आणि एसटी बसेससारखी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वातानूकुलून डबे असून, आधुनिक पद्धतीचे स्वच्छतागृहे बसविण्यात आली आहे.