Wed, Sep 26, 2018 11:03



होमपेज › Nashik › पंचवटीत पतंग काढताना शॉकने बालकाचा मृत्यू

पंचवटीत पतंग काढताना शॉकने बालकाचा मृत्यू

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:55PM

बुकमार्क करा





पचंवटी : वार्ताहर

पेठ रोडवरील  फुलेनगर येथे वीजतारेवर अडकलेली पतंग लोखंडी गजाने काढताना शॉक लागून दहावर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.9) दुपारी घडली. गुरू किशोर भोंड असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

फुलेनगर येथील कातारी गल्लीत राहणारा गुरू भोंड हा घराजवळ पतंग उडवत होता. त्यावेळी त्याची पतंग वीजतारांवर अडकली. भोंड याने पतंग काढण्यासाठी लोखंडी गज आणला. पतंग काढण्याचा प्रयत्न करत असताना वीजतारेतील प्रवाह गजात उतरला. विजेच्या धक्क्यामुळे भोंड हा फेकला गेला. आजूबाजूच्या लोकांना ही घटना लक्षात येताच त्यांनी भोंड याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत  घोषित केले.