Thu, Jun 27, 2019 18:37होमपेज › Nashik › निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे  पंढरपूरकडे प्रस्थान

निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे  पंढरपूरकडे प्रस्थान

Published On: Jun 28 2018 2:39PM | Last Updated: Jun 28 2018 2:39PMञ्यंबकेश्वर, ( जि. नाशिक)  : प्रतिनिधी 

हरिनामाच्या गजरात,  संत निृत्तीनाथांसह माऊलींच नाम घोष आणि भक्ती रसात तल्लीन होऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी संत  निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे  गुरुवारी  सकाळी ११  वाजता  विठ्ठल नामाच्या गजरातील उत्साही वातावरणात पंढरपुरच्या दिशेने रवाना झाली.

  ञ्यंबकेश्वर  येथील संत श्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ समाधी मंदिरात  मुख्यमंत्री यांचे एस. डी. ओ. श्रीकांत भारती व संस्थान अध्यक्ष संजय धोंडगे यांच्याहस्ते तसेच नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराधयक्ष पप्पू शेलार,  समीर पाटणकर,  नगरसेवक श्यामराव गांगापुत्र, कैलास चोथे ,  पालखी मानकरी,  पालखीत सहभागी होणाऱ्या  भाविक तसेच समाधी मंदिर देवस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले.  यावेळी  माधवी निगडे,   शिवाजी मोरे,  बाळासाहेब देहुकर , मोहन महाराज बेलापूर, डॉ. रामकृषण लाहवित्कर उपस्थित होते.

चांदीच्या रथात श्रींच्या चांदीच्या मुखवटय़ासह पादुका,   पालखीत निवृत्ती ज्ञानदेवांच्या जयघोषात ठेवण्यात आल्या. त्यानंतर कुशावर्त येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना स्नान घालून  हजारो वारकर्‍यांच्‍या उपस्थितीमध्ये ञ्यंबकेश्वमध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली. कुशावर्तावर नगराध्यक्षा पुरुषोततम लोहगावकर , उपनराध्यक्ष स्वप्नील शेलार यांनी पादुकांचे पूजन केले.  त्‍यानंतर पालखीचे त्र्यंबकेश्वर मंदिराकडे प्रस्थान झाले. पालखीला शहराच्या प्रवेशद्वारावर नागरीकामध्ये तर्फे  निरोप देण्यात आला.  

पालखीसमवेत रामकृष्ण लहवितकर, निवृत्तिनाथ मंदिराचे पूजक गोसावी बंधू,  मुरलीधर पाटील,  संपतराव सकाळे ,  रामभाऊ मुळाणे सहभागी झाले. पालखी महिरावणी त्यानंतर सातपूर मुक्कामी राहून  नाशिक शहरात प्रवेश करील.  मंगळवार  दहा जुलै रोजी अहमदनगर येथे संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा सकाळी दहा ते बारा या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.  ठिकठिकाणी मुक्काम करीत आषाढी एकादशीस पालखी पंढरपूरला पोहचेल.  यावेळी समाधी संस्थान अध्यक्ष संजय  धोंडगे,  पवन भुतडा,  पुंडलिकराव थेटे,  रामभाऊ मुळाणे,  पुंडित कोल्हे,  संजय  धोंगडे,पवन भुतडा,अविनाश गोसावी, योगेश गोसावी,  ललिता शिंदे,  डॉ. धनश्री हरदास,  जिजाबाई लांडे,  आदी उपस्थित होते.

निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा मार्ग पुढील प्रमाणे.

नाशिक, पळसे, लोणारवाडी,  सिन्नर,  कुंदेवाडी, खंबाळे, भोकणी, पारेगाव,  तळेगाव,  दिघे, गोगलगाव, लोणी, राजुरी, श्रीरामपुर, बेलापुर,   देवलाली प्रवरा,  राहुरी,  वांबोरी,  डोंगरगाव,  आढाववाड़ी.   तुकडओढ़ा,   साकत,  वाटेफळ            घोगरगाव,  कठिनदेव,  मिरजगाव, चिंचोली काळदाते,  कर्जत,  धांडे वस्ती कोरेगाव, अंबी जळगाव,  रावगाव,  करमाळा            जेऊर,शेलगाव वांगी, कंदर,टेंभुर्णि         दगडी,अकोला,परिते               करकंब,  पांढरेवाड़ी,चिंचोली, वाखरी या मार्गी पालखी  पंढरपुरर्यंत जाणार आहे.