Sat, Feb 16, 2019 21:15होमपेज › Nashik › ओझरला द्राक्ष व्यापार्‍यावर प्राणघातक हल्ला

ओझरला द्राक्ष व्यापार्‍यावर प्राणघातक हल्ला

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 08 2018 11:33PMओझर : वार्ताहर

येथील द्राक्ष व्यापारी गोपाल जगन्नाथ धामट (48) यांच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करीत गंभीर जखमी केले. धामट यांची प्रकृती स्थिर असून, नाशिकच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत माहिती अशी की, येथील द्राक्ष व्यापारी गोपाल जगन्नाथ धामट हे मुंबई-आग्रा महामार्गावरील धामटनगर येथील आपल्या कांद्याच्या चाळीत कामकाज करीत असताना शनिवारी सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करीत प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात धामट जखमी झाले. धामट यांचा पुतण्या संकेत याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. या घटनेत काही रक्कमदेखील हल्लेखोरांनी पळवल्याचे सूत्रांनी सांगितले.