Fri, Apr 26, 2019 00:00होमपेज › Nashik › अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबविण्याचे आदेश देणार

अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबविण्याचे आदेश देणार

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 11:15PMसिडको : प्रतिनिधी

‘मी संबंधितांना सिडकोमधील निवासी घरांबाबतची अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबविण्यास सांगतो’, असे आश्‍वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. सीमा हिरे यांना भ्रमणध्वनीद्वारे दिले. यामुळे सिडकोवासीयांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेने सिडकोत सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा धसका घेतलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आ. हिरे यांनी सिडकोतील ज्या भागात मनपाने रेड मार्किंग केले आहे, त्या भागात बुधवारी (दि.23) बैठक घेतली. या बैठकीदरम्यान आ. हिरे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यामध्ये त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेत त्यांना धीर धरण्यास सांगितले. आ. हिरे यांनी नागरिकांना दिलासा देताना सांगितले की, मुख्यमंत्री यांची वेळ घेऊन सिडकोवासीयांच्या भावना मी त्यांच्यासमोर मांडणार आहे. घाबरून जाऊ नका, यातून लवकरच मार्ग निघेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, बाळासाहेब पाटील, एकनाथ नवले, मुन्ना हिरे, दिलीप देवांग, चारुहास घोडके, रमेश उघडे, मयूर लवटे, सुशील नाईक, रोहन कानकाटे, नंदन खरे उपस्थित होते. 

कारवाई थांबविण्याची मागणी

रायगड चौक परिसरातील संतोष नागरे, सुशील विसपुते, अशोक पवार, जगदीश बाविस्कर, वैशाली नवले, कल्पना नेरकर, यादव अहिरे, रवींद्र डावखर, योगेश चव्हाण तर तानाजी चौकातील ताराबाई पगारे, देवकी खालकर, भारती गांगुर्डे, विद्या राऊत, वैशाली महाले यांच्यासह शेकडो नागरिकांनी आ. हिरे यांना निवेदन देऊन अतिक्रमण निर्मूलन कारवाई थांबविण्याची मागणी केली.