Mon, Jun 17, 2019 03:14होमपेज › Nashik › विभागीय नियंत्रकांच्या आदेशालाच एसटीकडून कात्री!

विभागीय नियंत्रकांच्या आदेशालाच एसटीकडून कात्री!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : रावसाहेब उगले

पिंपळगाव बसवंत आणि चांदवड बसस्थानकात नाशिक विभागातील सर्व बसेस थांबविण्याचे आदेश विभागीय नियंत्रकांनी 15 जानेवारी 2015 रोजी दिलेले असताना विभागीय नियंत्रकांच्या या आदेशाला सटाणा आणि नाशिक-1 आगाराने कात्री लावली आहे. त्यामुळे याबाबत अजूनही विभागीय नियंत्रकांकडून कुठलीही कारवाई झाल्याचे दिसत नाही.

13 मार्च रोजी पिंपळगाव बसवंत स्थानकात सटाणा आगाराच्या वाहकाला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर सटाणा आणि नाशिक-1 आगाराने विभागातील लांब पल्ल्याच्या बसेसमधून ओझर, एचएएल, पिंपळगाव बसवंत येथील प्रवासी घेण्यास मनाई केली आहे. तसे लेखी आदेशही लावण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या प्रवाशांना पुणे-सटाणा बससह इतर लांब पल्ल्याच्या बसेस घेत नाहीत. परिणामी, प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी 15 जानेवारी 2015 रोजी जावक क्रमांक - 104 नुसार नाशिक-1, मालेगाव, मनमाड, सटाणा, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी, लासलगाव, कळवण, पेठ, येवला, पिंपळगाव बसवंत आगारप्रमुखांना काढलेल्या आदेशात आपल्या आगाराच्या सर्व बसेसला पिंपळगाव बसवंत व चांदवड स्थानकात नेण्याचे सूचित केले होते. त्याबाबतची नोंद रजिस्टरमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, 13 मार्च रोजी पिंपळगाव स्थानकात वाहकाला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर सटाणा आणि नाशिक-1 आगाराने विभागीय नियंत्रकांच्या आदेशालाच कात्री लावल्यामुळे प्रवाशांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


  •