होमपेज › Nashik › ओरिएंटनलच्या सहा अधिकार्‍यावर गुन्हा दाखल होणार 

ओरिएंटनल इन्शुरन्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश : जिल्हाधिकारी

Published On: Jul 11 2018 6:58PM | Last Updated: Jul 11 2018 6:29PMजळगाव : प्रतिनिधी  

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकर्‍याच्या पिक विमा योजनेतर्गत पैसे भरले होते. मात्र, या रक्कमेत ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने अपरातफर केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिेलेल्या आदेशानुसार जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक प्रल्हाद सपकाळे यांनी जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, भारत सरकारच्या आदेशाने २०१७ साली प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गत पिक विमा योजना शेतकर्‍यानी घेतली होती. या योजनेत जिल्ह्यातील 72554 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता. या शेतकर्‍यांनी पिक विमा योजनेचा हप्तादेखील भरला होता. तसेच बँकेने बिगर कर्जदाराची व कर्जदार सभासदाची विमा रक्कम वेळेवर भरली. तसे त्याच्या खात्यावर आरटीजीएस केलेले आहे. बँकेने 12 कोटी 95 लाखाची रक्कम त्यांना वर्ग केली आहे. मात्र कंपनीने 17 हजार 410 शेतकर्‍यासाठी 19 कोटी 90 लाख रूपयाची नुकसान भरपाई दिली. मात्र, 55 हजार 144 शेतकर्‍यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. कंपनीला यासंबधी 6 पत्र पाठविले मात्र, अद्याप कंपनीने त्याची दखल घेतली नाही. सभासदांना सर्कल नुसार नुकसान भरपाई दिलेली नाही. 

34 हजार 167 सभासदांना 44 कोटी 71 कोटी 17 रूपये नुकसान भरपाई मिळायला पाहिजी होती. मात्र त्यापैकी फक्त 17 हजार 410 सभासदांना 19 कोटी 90 लाख रूपये नुकसान भरपाई दिली. तरी 16 हजार 757 सभासदांची 24 कोटी 80 लाख 57 एवढी नुकसान भरपाई मिळायची आहे.  72 हजार 554 शेतकर्‍याची 12 कोटी 95 लाक 36 विमा रक्कम जमा करूनही ती स्विकारूनही ओरिएन्टल कंपनीच्या अधिकार्‍यानी पोर्टलवर यासंबधी माहिती दिली नाही. तसेच त्यानी असंख्य त्रुटी असलेल्या याद्या जाहिर केल्या. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देवून उर्वरित रक्कम 24 कोटी 80 लाख हडप केल्याचा आरोपी जिल्हा बँकेने केला आहे. त्यामुळे आज जिल्हा बँकेचे सरव्यावस्थापक प्रल्हाद सपकाळे यानीं लिखीत तक्रार जिल्हा पेठ पोलिसात दिली आहे.

शेतकर्‍याच्या पिक विमा योजनेसाठी जळगाव जिल्हा बँकेला असलेली ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी रद्द करून दुसरी कंपनी मिळावी असा ठराव करण्यात आला आहे.त्यासाठी कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री ,कृषी मंत्री यांना देखील पत्र व ठराव देण्यात आला आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा योजनेतर्गत विमा कंपनी नुकसान भरपाई देईल मात्र ओरिएन्टल कंपनीने आपल्या भागात बोळ आळी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावरही एक रूपयाचा पिक विमा दिलेला नाही अशी माहिती जिल्हा बॅकेचे व्यवस्थापक देशमुख यानी पत्रकारांशी बोलताना दिली.