Thu, Apr 25, 2019 23:52होमपेज › Nashik › नाशिक : वणी येथे कांद्याच्या चाळी जळुन खाक (Video)

नाशिक : वणी येथे कांद्याच्या चाळी जळुन खाक (Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वणी (नाशिक) : अनिल गांगुर्डे

वणी पिंपळगांव रस्त्यालगत असलेलल्या कांद्याच्या चाळींना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अंदाजे एक कोटी रूपयांच्या आसपास नुकसान झाले आहे. कांद्याच्या ८१ चाळी या आगीत जळून खाक झाल्या.

यबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वणी पिंपळगाव रस्त्यालगत असलेल्या किसनलालजी बोरा , रितका अमित खाबिया, कृतिका सुमित खाबिया, सचिन साखला यांच्या मालकिच्या कांद्याच्या एकूण ८१ चाळी जळून खाक झाल्या. या कांद्याच्या चाळी रिकाम्या असल्याने मोठे नुकसान होण्यापासुन वाचले. कांद्याच्या चाळींच्या मागील बाजुस असलेल्या विजेच्या डिपीवरून ठिणगी पडुन गवताने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागलेल्या बाजुने जोराच्या वाऱ्यामुळे व आजुबाजुला गवत असल्याने काही क्षणात ही आग चाळींना लागली. वणी शहरात अग्नीशमन व्यवस्था नसल्याने ग्रामपंचायतच्या ट्रक्टरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु काही केल्या आग विझलीच नाही व या ठिकाणी असलेल्या कांद्याच्या चाळी व दोन मोठी शेड जळाली आहेत. तसेच या ठिकाणी असलेलले काही प्लास्टीकचे कॅरीट तसेच ताड प़त्री,बारदाने तयेच बांबु लाकडी साहित्य बरेच यात जळुन खाक झाले.

पिंपळगांव येथील अग्नीशमन दलाची गाडी आल्यानंतर आग विझविण्यात आली. या ठिकाणी वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी हजर झाले. नागरिकांची गर्दी झाल्याने आग विझविण्यात अडथळे येत होते.


Tags : Onion, Storage, Fire


  •