Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Nashik › कांद्याची घसरगुंडी!

कांद्याची घसरगुंडी!

Published On: Feb 08 2018 1:40AM | Last Updated: Feb 08 2018 1:40AMनाशिक : टीम पुढारी

कांदा निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर लासलगावसह नाशिक जिल्ह्यात कांदा बाजार आवारावर आलेली तेजी पुन्हा आवक वाढ झाल्याने ओसरली. लासलगाव येथील कांदा लिलावात बुधवारी (दि. 7) सकाळच्या सत्रात लिलाव सुरू होताच वेगाने घसरण होत भाव पूर्वपदावर आले. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या नाराजीत भर पडली. मंगळवारच्या तुलनेत किमान भावात 150, कमाल भावात 600, तर सरासरी भावात 450 रुपये प्रतिक्‍विंटल घसरण झाली.

येवला बाजार समितीत सोमवार, मंगळवारी असलेली तेजी बुधवारी (दि.7)  600 रुपयांनी कमी होऊन कांद्याचे दर मागील आठवड्याच्या 1500 ते 1800 रुपयांच्या पातळीवर येऊन राहिले आहेत. एक महिन्यामध्ये 50 टक्के कांदा घसरला पण ते कुणाला दिसत नाही. निर्यातमूल्य हटवल्यावर 1500 चे कांदा 2000 च्या आसपास गेल्यावर ओरड केली जाते. याबाबत शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्‍त केली. तर मनमाड-येवला मार्गावर संतप्त शेतकर्‍यांना काही काळ रास्तारोको आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.