Sun, Nov 18, 2018 09:46होमपेज › Nashik › बोली कमी लावल्याने कांदा उत्पादक संतप्त

बोली कमी लावल्याने कांदा उत्पादक संतप्त

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 24 2018 11:07PMनामपूर : वार्ताहर

नामपूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीत शुक्रवारी (दि. 24) सुमारे 600 वाहनांतून हजारो क्‍विंटल कांद्याची आवक झाली. त्यामुळे बाजारभाव घसरले. कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये यामुळे नाराजी पसरली आहे. काही काळ शेतकरी व व्यापार्‍यांत वादही झाला.

मोसम खोर्‍यात यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहेे. उत्पादन जादा झालेले आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात चाळीत कांदा साठवलेला आहे. एप्रिल महिन्यापासून साठवलेला कांदा चार महिने उलटून भाव वाढत नसल्याचे नाईलाजाने शेतकर्‍यांनी विक्रीला काढला आहे. त्यामुळे कांद्याच्या आवकेची मोठी लाट आली आहे.

परराज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे कहर केल्याने कांद्याची आवक त्या राज्यातील बाजारपेठेत खपत नाही. माल तिकडे पोहचत नाही. कर्नाटक, राजस्थान या भागात नवीन कांदा विक्रीला येण्यास सुरुवात झाली आहे.  त्यामुळे नाशिकच्या कांद्याची आवकेला  मागणी कमी झालेली आहे. मागणी कमी व आवक अधिक, अशी अवस्था नामपूर बाजार आवारात झाल्याने आज कांदा बाजारभाव घसरले. दर अजूून कमी होतील, या धास्तीने  शेतकरी बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला होता. शुक्रवारी (दि. 24) सकाळी 11 वाजता नामपूर बाजार समितीत नियमित लिलावास सुरुवात झाली. वाढत्या आवकमुळे बाजार समिती प्रशासनावर कामाचा मोठा बोजा पडला असून, आगामी काळात अजून प्रचंड आवक होण्याची शक्यता बाजार समिती प्रशासनाकडून व्यक्‍त होत आहे. केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, आ. दीपिका चव्हाण, राज्यमंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेत नाफेडला कांदा खरेदी करण्याचे निर्देश देण्याची मागणी कांदा उत्पादक करीत आहे.