Thu, May 23, 2019 14:22
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › कामगार पॅनलची ‘हॅट्ट्रिक’

कामगार पॅनलची ‘हॅट्ट्रिक’

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:43AMनाशिकरोड :

मजदूर संघाच्या निवडणुकीत कामगार पॅनलने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर वर्क्स कमिटीतही हाच कल कायम राहिला. दोन्ही प्रेसमध्ये कामगार पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले असून, आपला पॅनलचा धुव्वा उडाला आहे.

रविवारी मजदूर संघ निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोमवारी आयएसपी व सीएनपी या दोन्ही विभागांत वर्क्स कमिटीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. यंदा प्रथमच दोन्ही निवडणुका एकत्रित घेण्यात आल्याने कामगारांचे निकालाकडे लक्ष लागले होते. याप्रसंगी कामगार पॅनलचे नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्‍वर जुंद्रे, माधव लहांगे, उत्तम रकिबे, जयराम कोठुळे, इरफान शेख, भगवान मोरे, रमेश खुळे, राजेश टाकेकर, सुनील आहिरे, दगू पाळदे, उल्हास भालेराव आदींसह कामगार उपस्थित होते.

निवडणुकीत विजयी उमेदवार : आयएसपी विभाग (कामगार पॅनल):  सचिन तेजाळे (895), डॉ. चंद्रकांत हिंगमिरे (893), बळवंत आरोटे (846), भीमा नवाळे (841), अशोक पेखळे (838), दत्तात्रय गवळी (828), भाऊसाहेब सूर्यवंशी (814), मच्छिंद्र मगर (812), बबन सैद (806).

आपला पॅनल : बाळासाहेब चंद्रमोरे (804), दगू खोले (785). स्टाफ : कामगार पॅनल : राहुल रामराजे (174), तुषार साहुसाखडे (143). आपला पॅनल : गयाप्रसाद शर्मा (122).

सीएनपी विभाग (कामगार पॅनल) : नंदू कदम (1012), संतोष कटाळे (957), योगेश कुलवदे (945), अरुण चव्हाणके (909), साहेबराव गाडेकर (891), दिनेश कदम (884), तुळशीराम पाटोळे (827), संजय गरकळ (787), सुभाष ढोकणे (784). आपला पॅनल : राजू शहाणे (866), हरिभाऊ ढिकले (827), ए. एन. जाधव (777). स्टाफ : विनोद ढेरिंगे (कामगार पॅनल 117), रवि गोजरे (आपला पॅनल 141).