Fri, Nov 16, 2018 15:24



होमपेज › Nashik › बोहल्यावर चढण्याआधी युवकावर काळाचा घाला

बोहल्यावर चढण्याआधी युवकावर काळाचा घाला

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 1:04AM



देवळाली कॅम्प : वार्ताहर

घरात लग्नसमारंभाची तयारी सुरू असतानाच, रूळ ओलांडताना रेल्वेगाडीचा अंदाज न आल्याने संसरी गावातील युवकाचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी  (दि.8) पहाटे घडली. संसरी गावातील नीलेश अशोक गिते (27) याचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता.

तो नेहमीप्रमाणे रविवारी (दि.8) पहाटे भाजीपाला भरण्यासाठी देवळाली कॅम्पकडे येत असताना, रेल्वेलाइन ओलांडत असताना गाडीचा अंदाज न आल्याने धक्का लागून मृत्यू झाला. नीलेशचा येत्या रविवारी (दि.15) विवाह होणार होता. मात्र, काळाने नीलेशला बोहल्यावर चढण्यापूर्वीच घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.