Thu, Apr 18, 2019 16:05होमपेज › Nashik › टॅक्टरच्या धडकेत एक ठार

टॅक्टरच्या धडकेत एक ठार

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 11:07PMकळवण : वार्ताहर 

तालुक्यातील मोकभनगी येथेेे अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात एक ठार तर, एक जखमी झाला आहे. जखमीवर  उपजिल्हा रुग्णलायत उपचार सुरू आहेत. 

मोकभणगी येेथे रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोटरसायकलस्वार लक्ष्मण दादाजी हिरे (32) यांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या पत्नी जखमी झाली आहेत. मांडवाचा कार्यक्रम करून घरी जात असताना हा अपघात झाला. अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने धडक दिल्याने हे दाम्पत्य जखमी झाले होते. अपघातानंतर टॅक्टरचालकावर कठोर कारवाई करावी, तसेच अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी करीत मृताच्या नातेवाईकांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. 

अवैध वाळू उपसा संदर्भात कडक कारवाई केली जाईल तसेच सदर वाहनाचा तपास करून त्यांच्या कडक कारवाई करण्यात येईल असे    पोलीस निरीक्षक सुजय घाडगे यांनी दिले. त्यानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेऊन रास्तारोको आंदोलन मागे घेतले.