Sat, Jul 04, 2020 08:54होमपेज › Nashik › नंदुरबार : गोमांससह दीड लाखांची गुरे जप्त

नंदुरबार : गोमांससह दीड लाखांची गुरे जप्त

Last Updated: Jun 05 2020 8:37PM
नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

कत्तलीसाठी आणलेल्या सुमारे एक लाख ४० हजार रुपये किमतीच्या गाय बैलांसह मोठ्या प्रमाणात मांस जप्त करण्याची धडक कारवाई कुरेशी मोहल्यात शहर पोलिसांनी केली.

लॉकडाऊन चालू असताना आणि वाहतुकीला बंदी असतानाही शहरात गोवंशाची कत्तल करून मांस वाहतूक व विक्री चोरट्या मार्गाने चालू होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील कुरेशी मोहल्ल्यात त्रिकोणी बिल्डिंगच्या लागून एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश कत्तल केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून आज (दि.५ जून) सकाळी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी पथकासह जाऊन अचानक तपासणी केली असता १ लाख ३९ हजार ९०० रुपये किमतीचे १४ गाय, बैल, वासरू पत्र्याच्या शेडमध्ये क्रूर पद्धतीने कोंबून बांधलेले आढळून आले. शिवाय त्या ठिकाणी नुकतेच कापलेले मांस, चाकू, सुरे, कोयतेही सापडले. ते सर्व जप्त करीत मुस्‍तकीम शेख कुतुबुद्दीन कुरेशी या २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात तोंडाला मास्क अथवा रुमाल न बांधता कोरोना विषयक आदेशांचे उल्लंघन करणे तसेच प्राणी मात्र विषयक कायद्याचे उल्लंघन करणे या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.