Thu, Nov 15, 2018 05:16होमपेज › Nashik › नाशिक: बसच्या धडकेत युवक ठार

नाशिक: बसच्या धडकेत युवक ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातपूर (नाशिक): वार्ताहर 

नाशिक-त्र्यंबकरोड रिजविया मशिदीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या तरूणाला बसची धडक बसल्याने तो जागीच ठार झाला. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पांडुरंग कंधालकर ( राहणार नांदेड वय 3८ ) हा दुपारी पावणेतींनच्या दरम्यान रस्ता ओलांडत होता. त्यावेळी राज्य परिवहन मंडळाच्या राज्य परिवहन मंडळाच्या बस क्रमांक एमएच १२ ई.एफ ६२३३ ची धडक या युवकाला बसली. हि धडक इतकी जोरदार होती की, युवक जागीच ठार झाला. अधिक तपास हवालदार सी. एस.खरे करत आहे. 

काही दिवसांपूर्वी रुखसार शेख या १४ वर्षीय मुलीचा असाच रस्ता ओलांडताना मनपा कार्यालयासमोर मृत्यू झाला होता.  महिन्याभरातील ही दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. त्र्यंबकरोडवर सातपुर परिसरात आवश्यक तिथे गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. 
 

Tags : Younger, Boy, Dead, Bus, Accident, Nashik, Crime, 


  •