Mon, Sep 24, 2018 13:23होमपेज › Nashik › नाशिक : ट्रक साई पालखीत घुसला; १ ठार, ३ जखमी

ट्रक साई पालखीत घुसला; १ ठार,३ जखमी

Published On: Dec 10 2017 10:04AM | Last Updated: Dec 10 2017 10:04AM

बुकमार्क करा

सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर-घोटी महामार्गावर साई पालखी घेऊन जाणाऱ्या भक्तांना भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना रविवारी (दि.१०) पहाटे सहा वाजेच्या सुमारास हरसुले फाट्याजवळ घडली. या अपघातात १ साईभक्त ठार तर ३ साईभक्त गंभीर जखमी झाले आहे.

आज पहाटे इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथुन शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी पायी पालखी निघाली होती. हरसुले फाट्याजवळ अज्ञात ट्रक पालखीत शिरला. या अपघातात रोशन गणेश लगड (१८. रा. टाकेद) हा साईभक्त जागीच ठार झाला. तर तीन साईभक्त गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले. सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख घटनास्थळी दाखल झाले आहे.