Sun, Mar 24, 2019 12:36होमपेज › Nashik › ‘ऑन डिमांड एक्झाम’ पॅटर्न लागू होणार

‘ऑन डिमांड एक्झाम’ पॅटर्न लागू होणार

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 12:57AMनाशिक : प्रतिनिधी 

नोकरीनिमित्त परीक्षा देऊ न शकणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत प्रायोगिक तत्त्वावर बदल केला आहे. ‘ऑन डिमांड एक्झाम पॅटर्न’ (विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार परीक्षा) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लष्कर, पोलीस यासह दहा विशेष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा देता येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली. पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. 

विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन स्लॉट बुक करावा लागेल. त्यात परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक असेल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्र निवडावे लागेल. त्यानंतर विद्यापीठातर्फे परीक्षांचे नियोजन केले जाईल. त्यानुसार संबंधित परीक्षा केंद्रांवर विद्यापीठातर्फे प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका पुरविल्या जातील व त्यानुसार परीक्षा घेतली जातील.  मुक्त विद्यापीठातर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून 200 ते 250 नवीन अभ्यासक्रम केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

Tags : Nashik, Nashik news, On demand exam, pattern, will applicable